Thursday 22 December 2011

एक कोंब ...

एक बीज रूसल 
कुंडीच्या कडेशी  जाऊन बसलं
माती नाही अंगावर 
उन्हाचे चटके तोंडावर 
तसच निपचित पडल 
त्वचा आपली करपत राहील 
इतक्यात कुठून आली थंड पाण्याची धार ....
गटागटा पाणी पिऊन पोट फुगल फार ....
बीजाच्या पोटात झाली गडबड घाई ,
हळूच पोटातून एक कोंब बाहेर येई ...
मग त्याची उडाली भारी गडबड 
मातीने तर केली नुसती बडबड 
हवा ,पाणी ,उनाने मग त्याला सावरल ...
हळूच ते मातीच्या कुशीत ते शिरलं ...

Sunday 19 June 2011

छत्री

एकदा काय झाल ,
कोपऱ्यात ठेवलेली छत्री माझ्यावर  रागावली
मला पण बाहेरच्या उनात नाही जायचे म्हणून रुसून बसली
मी म्हटले तिला, " अगं अस काय करतेस , एक माझ थोड ?"
तर मलाच ती म्हणते , " जशी तू माझ्याशी वागतेस !"
"लक्ष माझ्याकडे कधी देत नाहीस ,
पावसात भिजायला मला सोबत घेत नाहीस ,
मीही त्या पावसाची वाट बघत असते ,
मात्र तो आला कि तू भिजायला एकटी निघून जातेस "
मी म्हटले ,"खर आहे तुज चुकलंच कि ग माझ ,
वर्षभरात तुझाकडे लक्ष नाही गेल ,
पण ,आता माझासोबत येशील  ?,
उनाच्या तडाख्यात थोडी सावली देशील  ?
यंदाच्या पावसात तुला मी नक्की भिजविण "
तर लगेच खुदकन हसली .....
खटकन उघडून माझ्या सोबत निघाली ...

Thursday 2 June 2011

आला पाऊस....

गार गार हा सुटला वारा,

सुघाधित हा आसमंत सारा ,

वाऱ्याला जणू वेड लागले ,

नभ आकाशी नाचू लागले ,

श्कणात अशी ही जादू घडली ,

चकचकीत एक वीज उमटली ,

थेंबा थेंबा ची नक्षी घालत ,

आला पाऊस वाजत -गाजत !!

Tuesday 21 December 2010

काजळ रेघ ....

कळाले नाही काय झाले ,
जेव्हा त्याने तिला पहिले ,
डोळ्यातल्या काजळ रेघेवर ,
त्याचे मन राहिले ,
आरशात बघत काजळ पुसताना ,
तिला डोळ्यात काहीतरी खुपले ,
काय हरवलं आपल हे ,
दोघानाही समजले ,
त्याला मात्र इकडे हरवल्याच्या शोधात ,
कशाचाच रंग दिसत नव्हता ,
सगळीकडे काजळाचा 
एक पट्टा होता ........

Friday 17 December 2010

मनाच्या मनाला

मनाच्या मनाला ,

पडला एकदा प्रश्न ?
मनातच ठेवावा ?
कि मनातून बाहेर काढावा ?
नि कुणासमोर मांडावा ?
मांडावा ? कि सांडावा ?
कि मनातच त्याच्याशी भांडावं ?
..... ... .मनात आहे तिकडे कोण ?
म्हणाव त्या मनाला आता माझ्याशी बोल ! 
..... ....एका मानाने शब्द गोळा केले ,
दुसऱ्या मनाने ते जपून मनातच ठेवले ...............

Wednesday 21 April 2010

मनातला पाऊस ...

मन पाऊस-पाऊस ,

ओघळला नभातून -
मन पावसाचा थेंब ,
हिरव्या पानावर प्रतिबिंब ..
मन पावसाचा गारवा ,
मिठीत त्याच्या मोहरावा ..
मन पावसाचे तळे ,
त्यात सूर्यही वितळे ..
मन पावसाच्या धारा ,
कुठे पळत सुटला हा वारा ..?
मन पावसाचा ओलावा ,
जसा मातीवर शिडकावा ..
मन गार -गार वारा ,
सुघंधी आसमंत सारा ..
मन पावसाची रिमझिम ,
आतुरले माझे मन ..
मन इवले -बावले ,
त्यात तारांगण हे खेळले .

Friday 16 April 2010

आठवणीच गाण........

मी तुझ्या जवळ
तू माझ्या जवळी नाही
परी जगणे थांबले नाही -
रोज उठोनी ऑफिसला मी जातो ,
फोन घेउनी नंबर डायल करतो ,
पण रिंग वाजवत नाही ....
दिवस किती ते मोजणे मी सोडले ,
श्कन आठवणींचे सोबत घेऊन जगणे ,
परी तुजला भेटणार नाही ...
मी तुझ्या जवळ
तू माझ्या जवळी नाही
परी वेळ थांबली नाही ,
प्रत्येक श्काणाची ओळख आपली -आपली
मलाच म्हणते कोण तू ? ..माझी सावली
पण दिवस माझा राहिला नाही ....
रोज नव्या नव्या वाटेने मी जातो ,
तरी घरीच परतुनी येतो -
तू माझ्या जवळी नाही ,
नि मी तुझ्या जवळी नाही
जाणीवा संपुनी आता ...
उरले काहीच नाही ....

इंद्रधनुष्य पाहायचाय .....

कराल तेव्हा ना ....... ?

करायच्या असतात लाख गोष्ठी ...



पण कराल तेव्हा ना ....... ?
बोलायचं असत बरच काही ,
पण शब्दात मांडलं तेंव्हा ना .........?
आठवणी तर खूप असतात ,
पण मनात जपाल तेंव्हा ना .....?
विसरायचं असत बरच काही ,
पण लक्षात ठेवाल तेंव्हा ना.......?
लिहायचं असत खूप काही ,
पण .... सुरवात कराल तेव्हा ना ...?
करायचं असत बरच काही .....
पण ..... ........................